Friday, June 28, 2013

पुन्हा पुन्हा

पुन्हा पुन्हा
काळजातल्या वीणा झंकारल्या पुन्हा पुन्हा
बदलूनिया वेश आले , दुख्ख माझे पुन्हा पुन्हा !!ध्रु !!

प्रीतीच्या त्या आठवानी जीव माझा मोहरतो
लाख छळले तू तरीही मी तुला सावरतो
वेदनांशी खेळताना काय मी केला गुन्हा ?... !!१!!

मी असा शापित आहे , उजाडलेले गाव ज्याचे
खोडले तू नाव माझे तरी तुला मी जोडतो
पुसुनी टाक तू अंगी तुझिया चिकटलेल्या माझ्या खुणा ...!!२!!


देह लागला ढसालाया सूर्य कलाया लागला
नसता तू माझ्या भोवती तरी स्वप्नातच मी रांगतो
सोसलेल्या त्या क्षणांचा मागू नको हिशोब जुना !!३!!.

No comments:

Post a Comment