पायी नायी भुई आन नायी डोईवर छत
फुटलं आभाळ जसा कोपलाय देव
पाखरांच्या चोचीमधी दान कस द्याव ?
कडाडली वीज मला नाय तीच भ्याव
कोपितल्या तान्ह्याकड मन माझ धाव
जात होते मजुरीला पाटलाच्या मळ्यात .........
पायी नायी भुई आन नायी डोईवर छत
माझ्या फाटक्या संसाराचा आभाळात झुले झुला
डोई धरून लुगड समधा पावूस लोटला
गाली बघून आसव हाथ धन्यान धरला
घडीभर सये मला लई पावूस भावला
दिसू लागली डोळ्यात गहाणवटीची ग नथ ...
पायी नायी भुई आन नायी डोईवर छत
माझ्या लेकरानी बाई उभा पावूस झेलला
इवल्याश्या मुठीमधी सारा चंद्र ग झाकला
पाटी पेन्सिलीच्यासाठी हाथ वटीत घातला
कर्जदार यम सये उभा दारात ठाकला
मंग बांधली कनात आमि वरच्या नभात ...
पायी नायी भुई आन नायी डोईवर छत
No comments:
Post a Comment