Wednesday, August 7, 2013

शोधू कुठे मी आता

शोधू कुठे मी आता, माझा सखा तो भीम
दिसतो मला न आता, लढणारा माझा भीम

धरतीने धरले पाय, आभाळाने ओढले हात
वाराही झाला फितूर, त्यानेही केला घात

पुसण्या न आली डोळे, चुकार नदी माय
नभी फोडती हंबरडा, चुकलेली रानी गाय

रोज अब्रू झाकताना, बहिणींची विरली वस्त्रे
स्वप्नातही भेडसावी, नजरेची विखार शस्त्रे

विझुनी गेल्या मशाली, हाती आल्या पखाली
झिंगलेला समाज मागे, दैवाकडे खुशाली

थंडावले सारे बंड, नेतेही निघाले षंढ
जिन्दगानीत आमुच्या, का उजेडाचा खंड ?

मातीतुनी निघाला, निढळया घामाचा गंध
पाजळा नवी हत्यार, युद्धाचा जपुनी छंद

No comments:

Post a Comment