मुंबईतील परळ भागात महिला छायाचित्रकार म्हणून काम करत असलेल्या एका पत्रकार महिलेवर मुंबईतील सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. लोअर परळ आणि महालक्ष्मी यामधील रेल्वेमार्गालगतच्या भागातील शक्ती मील्स येथे रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही पीडित महिला छायाचित्रे काढण्यास शक्ती मीलनजिकच्या परिसरात गेली होती. त्यावेळी काही तरुणांनी तिला धमकावून जबरदस्तीने निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नेहमीप्रमाणे या प्रकऱणाची गंभीरपणे दखल घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडू असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी दिले आहे. तर विरोधकांनी सालाबादप्रमाणे आंबांच राजीनाम्याची मागणी केली आहे.
मीत्राला भेटण्यासाठी आलेल्या युवतीवर पोलीस शिपायासह आणखी तिघांनी अमानुष बलात्कार केलची घटना नुकतीच नांदेडमध्ये घडली. हिमायतनगर तालुक्यात राहणारी 8 व्या इयत्तेची विद्यार्थिनी आपल्या मीत्राला भेटण्यासाठी भोकर येथे आली होती. मात्र मीत्र न भेटल्याने ती गोंधळून गेली. त्याचा वेळी तिला भेटलेला पोलीस शिपाई सुनील संबाळकर याने तिला जबरदस्तीने रिक्षात घालून रिसोर्ट येथे आणले. तिच्यावर बलात्कार करून त्याने संदीप हंमद आणि राजू खांडरे या दोघा मीत्रांना बोलावून घेतले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला.
तर, मुंबईच्या ’रिन लाईन्स् ते चर्नीरोड या स्थानकाच्या दरम्यान पहिल्या वर्गाच्या लोकलच्या डब्यातून प्रवास करणार अमीरिकीन महिलेवर अज्ञात चोरट्याने हल्ला केला. तिला जखमी केले आणि तिच्याजवळचा मोबाईल तसेच बॅग घेऊन पलायन केले.तसेच, मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यात स्वित्झर्लंडमधील एका महिलेवर सात जणांना सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ती पतीसोबत ओरछा येथून आग्रयाला जात होती. रात्री काही जण काठ्या घेऊन त्यांच्याजवळ आले. दोघांनाही जबर मारहाण केली. त्यानंतर आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावरच सोडून सर्वजण पसार झाले.
महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशभरात आगडोंब उसळलेला असताना बिहारमध्ये चालत्या रेल्वेत लष्करी जवानाकडून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेने चालत्या रेल्वेतून उडी मारून आपले शील वाचविण्याचा प्रयत्न केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. बिहारमधून आरा, बक्सर मार्गे दिल्लीकडे निघालेल्या ब्रह्मपुत्र एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी दुपारी प्रसाधनगृहात गेलेल्या महिलेवर रमीश कुमार या जवानाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तर, बलात्काराची राजधानी बनलेल्या दिल्लीत न्यायालयाच्या आवारात महिलेवर वकिलांकडून सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे.घटसफोटाच्या खटल्याबाबत चर्चा करण्यासाठी एका महिलेला तिच्या वकिलाने पतियाळा न्यायालयात बोलावून घेतले. तिथे वकील आणि त्याच्या दोघामीत्रांनी या महिलेवर निर्घृण बलात्कार केला.
या सर्व घटनाकडे पाहिले असता का दिसते? केवळ गरीब कुटुंबातील, झोपडपट्टीतील, अशिक्षित महिलांवरच बलातकार होतात असे नाही तर सधन , सुशिक्षित घरातील महिलाही आता सुरक्षित राहिल नाहीत. इतकेच नव्हेतर केवळ गुंड प्रवृतीचे, व्सनी नराधमच बलात्कार करतात असे नाही. सुशिक्षित समजले जाणारे, काद्याचे आणि समाजाचे रक्षण करणची जबाबदारी असलेले वकील, पोलिस जवानल शिक्षक हेही बलात्कारासारखे निर्घृण बिभित्स कृत् करतात हे नाकारता येत नाही.
महिलांवरील लैंगिक शोषणाला आळा घालन्यासाठी विविध कायदे करून, कठोर शिक्षेची काद्यात तरतूद करून हा प्रश्न खरोखरच सुटणसारखा आहे का? शिक्षा वाढविलने गुन्हे कमी होत नसतात. प्रश्नाच मुळाशी जाऊन ,भावना बाजुला ठेवून सद्सद्विवेक बुध्दीने या प्रश्नाची सोडवणूक कराला हवी. लैंकिक कोंडी करून महिलांवरील लैंगिक अत्त्याचाराच्या अथवा बलात्काराच्या घटनांमध्ये घट होणार नाही.
डान्सबारवर बंदी घातलने बलात्कारच घटना कमी होतील असा आर, आर. पाटील यानचा आशावाद होता. पण बलात्कारांच्या घटनां’मध्ये वाढच होत गेली. केंद्र सरकारनेही बलात्काराविरूध्द कठोर कायदा केला तर देशभरात दररोज बलात्कार होतच आहेत. असे का होते याचा आपण कधी सारासार विचार करणार आहोत की नाही? विनयभंग, बलात्कार, मुलींची छेडछाड यांसारख्या गुन्ह्गयांवर होणार चर्चा आणि प्रतिक्रियांमधून कायदे कडक होणे वा त्याची कठोर अंमलबजावणी, पोलीस संरक्षण वाढविणे, पुरुषांची मानसिकता बदलणे अशा सूचना पुढे आणल्या जातात,पण पुरुषाची कामीच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी या विषयांवर कधीच कुणी चर्चा करीत नाही.
मानवीजीवनात महिलेला मुल होण्याचे शरीरनियम निसर्गाचे, परंतु शरीरसंबंधाचे नियम मात्र माणसांनी केले आहेत. यामुळे मानवी मनात आणि शरीरात जो एक आंतर्विरोध निर्माण झालेला आहे, त्याला सामोरे जाताना, त्याचा तात्काळ परिणाम हा समाजातील लैंगिक गुन्हेगारीत परावर्तित होतों. कारण शरीरसंबंधावर मेंदू आणि हार्मोन्सच्या नैसर्गिक कार्यात हस्तक्षेप केल्यासारखे होते. ज्याचे परिणाम निव्वळ लैंगिकतेपुरते मर्यादित न राहता, ते स्त्री-पुरुषांमध्ये मानसिक अशांती, अस्वस्थता, प्रक्षोभ, विकृती अशा पद्धतीने दृश्य होऊ लागतात.निसर्गाने सजीवांच्या जगण्यासाठी अन्नाची भूक आणि लैंगिक भूक अत्यावश्य केली आहे. जगण्यासाठी आणि संपूर्ण प्राणिजात टिकून राहण्यासाठी अन्नाची आणि लैंगिक भूक अशी निसर्गाची व्यवस्था आहे. त्यानुसार प्राणिजातीला पवित्रे घेण्यास भाग पाडले जाऊन शमविल्या जातात. त्या कोणत्याही प्राण्यांच्या ऐच्छिक नियंत्रणाखाली नसतात. शिवाय या दोन भुकांअभावी सजीव प्राणी विनाशाकडे जातात. मात्र विनाशाप्रती संघर्ष करण्याच्या सजीवांच्या आंतरिक गुणधर्मातून या भुका शमविण्याचा प्रयत्न सर्व प्राणी करतात. बुद्धिमान मनुष्यप्राणी तर हा प्रयत्न आटोकाट करतो. अन्नाच्या भुकेसाठी चोरी, मारामारी आणि लैंगिक भुकेसाठी जबरदस्तीच्या संबंधाची गुन्हेगारी केली जाते.
शरीराच्या पलीकडे निरपेक्ष प्रेम नावाची गोष्ट असते. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये निसर्गानेच प्रजननासाठी ओढ निर्माण केली आहे. हे आकर्षण सापेक्ष असते. पवित्र असते. आकर्षण, अभिलाषा आणि वासना यात मुलतः मोठा फरक असतो. आकर्षणानंतर सहवासातून प्रेम निर्माण होते. तर आकर्षणानंतर सहवास लाभला नाही तर त्याची जागा वासना घेते. या वासनेतूनच विकृती निर्माण होऊन महिलांवरील लैंगिक छळाचे रूप धारण करते.या बाबींचा विचार करणची वेळ आली आहे.
बलात्काराची प्रक्रिया प्रथम मेदूत घडते. नंतर संधी मीळताच ती वास्तवात उतरते. बहुसंख्य पुरूष मनातल्या मनात महिलांवर बलात्कार करीत असतात. गर्दीत महिलांना चोरटा स्पर्श करून अथवा लांब राहून त्यांच्या देहाचे नेत्रसुख घेणारी मडळीही आपल्या समाजात कमी नाहीत. आपल्या कामुक भावनांना शांत करण्यासाठी अनेकजण चित्रपट, दूरचित्रवाणी , इंटरनेट अथवा पुस्तके आणि अश्लिल सिडीची मदत घेत असतात. स्त्रीसुख हे जगातील परमोच्च सुख असल्याचे मानल्यामुळे हा गोंधळ होतो. तहानभूक याचप्रमाणे शरीरसुख ही एक मुलभूत गरज आहे, इतकेच मानायला हवे. त्याला अवास्तव महत्त्व प्राप्त झाल्याने हा घोटाळा होतो. स्त्रीदेहाची शास्त्रीय ओळख न झालेली, स्त्रीसुखापासून वंचित असलेली, कामभावनेचा अवास्तव बाऊ करणारी आणि ज्यांना खर अर्थाने प्रेम मीळाले नाही, अशी माणसे बळजबरीने आपली वासना शमविण्यासाठी बलात्कार करतात.
नुसते कायदे करून हा प्रश्न सुटणारा नाही. मानसिकता बदलण्यासाठी कायदे उपयोगाचे नसतात. आणि आपली प्राचिन संस्कृती आणि धर्म तर स्त्री - पुरूषांच्या असामानतेवरच आधारीत आहेत. आपण माणूस आहोत आणि माणूसच राहणार . सभ्य, सुसंस्कृत माणूस होण्याचा प्रयत्न करायला हवा. कोणताही माणूस जन्मतःच रानटी जनावर म्हणून जन्म घेत नाही. अथवा कोणीच जनमतः ‘अण्णा हजारे’ नसतो.
महिलांचे लैंगिक शोषण, महिला अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणाकडेही निरपेक्ष आणि स्वच्छ दृष्टीने पहायाला हवे. पुरूषप्रधान संस्कृतीवर बेतलेल्या आपल्या धर्मग्रंथांचाही नव्याने विचार व्हायला हवा. आपल्या चाली-रिती, धार्मीक बंधने, पुराणकथा, रिवाज या सर्व बाबींचा आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय कारणमीमांसा करून विचार करायला हवा.
- भगवान निळे

No comments:
Post a Comment