Thursday, August 22, 2013

अंधश्रद्धा

गेली वीस वर्षे महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी आवाज उठविणारे व जादूटोणाविरोधातील विधेयकासाठी प्रयत्न करणारे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक डॉ नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओन्कारेश्वर पुलावर अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. पुरोगामी समाजसुधारणांचा विचार सातत्याने धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दाभोलकर यांची हत्या महाराष्ट्रातील पुरोगामीत्व आणि चळवळीचा पराभव आहे. महाराष्ट्रात समाजसुधारकाची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या विचारांना सुरूवातीला विरोध होतो पण त्या विरोधापोटी कोणाची हत्या केली गेली असे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते.समाजात ज्या ज्यावेळी बदल घडवायचा असतो त्या त्यावेळी नवा विचार माडावा लागतो. नवा विचार माडताना जुन्या विचाराला मुठमाती द्यावी लागते. नवा विचार माडणार्‍यांना नेहमीच विरोध होतो. पण कालांतराने हाच विरोध करणारा समाज नवा विचार स्वीकारतो हे वास्तव आहे .
वैचारिक लढाई ही विचारानेच लढली गेली पाहिजे. मुस्कटदाबी करून, व्यक्तीला मारून हे विचार कधीही मरत नाहीत. उलट ते अधिक वेगाने फोफावतात. समाजातील प्रतिगामी मडळी जुने विचार, जुन्या चालीरीती, जुन्या खुळसट रुढी छातीशी कवटाळून बसतात. त्यांना नवा विचार पेलत नाही. मग ते धर्माच्या, संस्कृतीच्या, परंपरेच्या गोंडस नावाखाली पुरोगामी विचाराला विरोध करतात.
पुराणमतवादी मनडळी आग्रही, जहाल आणि हिंसक असतात. त्यांना नवा विचार अंगावर झुरळ पडल्यासारखा वाटतो. त्यांना नवा विचार करणारांचा तो विचार माडण्याचा घटनात्मक नैतिक अधिकार आहे हेही मान्य नसते. इतकेच नव्हे तर, नवा विचार माडणार्‍यांचे जगणेही त्यांना मान्य नसते. अशाच प्रतिगामी , पुराणमतवादी हिंसक मनडळींपासून गेल्या काही दिवसांपासून डॉ. दाभोलकरांना अंध:श्रद्धाविरोधी विधेयकावरून धमक्या द्यायला सुरूवात झाली होती. मात्र एकटे दाभोलकर या मनडळींना पुरून उरले होते.
डॉ दाभोलकर हे मुळचे सातार्‍याचे. त्यांचे कुटुंब हे सातारा जिल्ह्यातील दाभोल या गावचे म्हणून त्यांचे आडनाव दाभोलकर असे पडले. डॉ बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा ’ या चळवळीतून डॉ. दाभोलकरांचा संबंध पुरोगामी चळवळीशी आला. अंधश्र द्धा निर्मुलन संघटनेच्या राज्यात 150 शाखा कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी राज्यात दहा हजार शिक्षकांचे अंधश्रद्धा निर्मुलनाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेतले आहेत. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादकपद त्यांच्याकडे बारा वर्षापूर्वी प्रा. ग. प्र. पधान यांच्याकडून आले. त्यामुळे त्यांच्या चळवळीला अधिक गती ि’ळाली.
महाराष्ट्रात सामाजिक विचार मां डणार्‍यांची मोठी परंपरा आहे. पण ती खंडित झाली होती. दाभोलकरांनी स्वातंत्र्यानंतर खंडित झालेली ही विचार प्रबोधनाची परंपरा प्रतिकूल स्थितीतही नेटाने सुरू ठेवली होती.
त्यांचे महाराष्ट्राच्या वैचारिक चळचळीतील स्थान मोठे होते. बाबा आमटे, बाबा आढाव, श्याम मानव, यांच्याप्रमाणेच त्यांनी या परंपरेतून महाराष्ट्रात अनेक तरुण प्रेरित केले होते. कोणाच्याही श्रद्धा न दुखवता केवळ उघड्या डोळ्यांनी दिसणार्‍या अंध:श्रद्धांवर त्यांनी विवेकाने वार करण्याचे अखंड काम केले.
खरे पाहता, स्वातंत्र्यानंतर सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान व्हायला हवी होती. शिक्षणाचा प्रसार आणि प्रमाण वाढल्यामुळे ती अधिकच वेगाने पुढे जायला हवी होती. पण तिला पाहिजे तसा वेग आला नाही. उलट, सुधारणांना विरोध करणारा वर्ग एवढा प्रखर झाला की आपल्याला न आवडणारे विचार मांडणार्‍यांना जगण्याचा अधिकार नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
धर्मार्तंडानी आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्यांनी समाज सुधारणेविषयी चुकीच्या भावना जनमाणसात पेरल्या. समाज सुधारणेचा विचार म्हणजे धर्मविरोधी विचार असा समज दृढ करण्यात आला. धर्माचा राजकारणासाठी वापर करणारांनी अशा समाजाला खतपाणी घातले. धर्मातल्या कालबाह्य रुढींचे विश्‍लेषण करणे आणि अशास्त्रीय रुढींचा निषेध करणे म्हणजे धर्माचा अपमान आहे असा प्रचार जाणूनबुजून करण्यात आला. धार्मीक उन्मादाने प्रेरित झालेला तरुण वर्ग सामाजिक चळचळीला विरोध करायला लागला आणि तसे करणे हेच धर्माचे कार्य आहे असे मानायला लागला. सामाजिक चळवळ सुरू असते तेव्हा ती करणारे लोक संख्येने कमी असतात आणि असे विपरीत धर्मकार्य करण्यात धन्यता मानणारे, सुधारणांना विरोध करणारे संख्येने जास्त असतात.हे माठे दुदैव आहे.
लोकांचे दगड खाऊन आणि प्रतारणा सहन करून जे लोक नवा विचार माडतात ते संख्येने हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. सुधारणांना विरोध करणारे संख्येने जास्त असल्याने राजकीय नेते सुधारणांना उघडपणे पाठींबा देत नाहीत. राजकीय नेत्यांना बहुसंख्यकाची मते गमवायची नसतात. लोकांच्या हिताचा विचार लोकांनाच आधी कळत नाही. पण त्यांची नाराजी ओढवून घेऊन तो मांडत राहिले पाहिजे हा सुधारकांचा बाणा असतो. पण राजकीय नेते लोकांना नाराज करीत नाहीत. त्यांना आवडेल ते बोलत राहतात. त्यांच्या हिताच्या पण त्यांना नाराज करणार्‍या जादूटोणाविरोधी विधेयकासारख्या विषयात राजकीय नेते नेहमीच बोटचेपेपणाची भूमीका घेतात. ती भूमीका चुकीची आहे हे त्यांना कळते पण मतांच्या स्वार्थापोटी ते सुधारणांचा मो कळेपणाने पुरस्कार करीत नाहीत. परिणामी दाभोलकरांसारखे सुधारक एकटे पडतात आणि धार्मिक उन्माद पोटी त्यांना विरोध करणार्‍यांना, नेत्यांच्या सोयीस्कर मौनामुळे बल मिळते.
महाराष्ट्र सरकारच्या अंध:श्रद्धाविरोधी विधेयकाला फाटे फोडण्याचा काही लोकांचा उद्योग चालला आहे.ज्यांच्या मनातल्या आणि ते समाजात प्रसार करीत असलेल्या भाकड कल्पनांना शह बसणार आहे अशा मडळींना हा कायदा नको आहे. आज काही हिंदुत्ववादी संघटना या विधेयकाला विरोध करायला पुढे सरसावल्या आहेत. त्यातल्या ‘सनातन प्रभात’ सारख्या संघटनांचा विरोध समजून घेता येतो. कारण, ही संघटना मुळातच सनातनी आहे. आपल्या धर्मातल्या सर्व दुष्ट रूढींना आणि कालबाह्य परंपरांना आधुनिक रूप देऊन पुन्हा समाजावर थोपण्याचा त्यांचा उद्योगच आहे. धर्मतल्या रूढींचा बदलत्या काळाच्या संदर्भात फेरविचार केला पाहिजे असा विचार मांडणार्‍या आगरकर, फुले अशा समाजसुधारकांमुळे आपला समाज सुधारला आहे. पण, या समाजाला पुन्हा त्या काळ्या कालखंडात नेण्याचा या काही हितसंबंधी मांडळींचा डाव आहे. अशा संघटनेने या अंध:श्रद्धा विरोधी कायद्याला विरोध होत असेल तर तो त्यांच्या स्वरूपाला धरूनच आहे . पण वारकरी संप्रदायातल्या काही संतांनी,आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या विधेयकाला विरोध करावा हे त्या त्या तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे.
सामान्य माणूस धर्मवेडा असतो. तो परंपरा आणि रूढींचा त्याग करण्यास सहजा सहजी तयार होत नाही पण त्यांना तसे काही सांगायला गेलो तर तो नाराज होतो. आजकाल कोणत्याच पक्षाचे नेते समाजाला काही नवे शिकविण्यास तयार नाहीत. म्हणून या हिंदुत्ववादी पक्षांनीही समाजाची उगाच नाराजी नको म्हणून या विधेयकाला विरोध करायला तर सुरूवात केली आहे. त्यांनी लोक अधिक खुष व्हावेत म्हणून या विधेयकाला धर्मविरोधी ठरवून लोकांना भडकवायला सुरूवात केली आहे.
वारकरी संप्रदायाचीही अवस्था अशीच आहे. संतांना धर्माच्या नावावर चालणारे ढोंगधत्तुरे मान्य नव्हते, ही बाब वारकरी संप्रदायाला माहित नाही काय? या विधेयकात संताचाच विचार माडलेला आहे. श्रद्धा आणि अंध:श्रद्धा यातली सीमारेषा ही धूसर असून एकाला जी श्रद्धा वाटते ते दुसर्‍याला अंध:श्रद्धा वाटू शकते. म्हणून श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष असते असे नाही. काही अंध:श्रद्धा या व्यक्तिनिरपेक्ष असतात. डोक्यावर ’रशीचे दोन तुकडे आपटले म्हणजे रोग दुरुस्त होत नाहीत, सर्जरीचे कसलेही शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीने केवळ बोटाने शस्त्रक्रिया करतो म्हणणे हे थोतांड आहे. या गोष्टी कोणालाच खर्‍या वाटणार्‍या नाहीत. त्यांच्यावर बंदी आणून त्यांना शिक्षा केली पाहिजे. या कामात कसलेही वैचारिक मतभेद आडवे येण्याची सुतराम शक्यता नाही.
हे विधेयक गेल्या अकरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला मधूनच मान्यता मीळाल्यासारखे वाटते पण कोणी तरी काही तरी अडथळा आणतो. हे समाजाच्या हिताचे असल्याने ते प्रलंबित राहून चालणार नाही . समाजात अनेक प्रकारच्या अंध:श्रद्धा रूढ आहेत आणि त्या पायी लोकांचे जीवन खडतर बनलेले आहे. अनेकांची अनेक प्रकारे फसणूक होत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण जसे वाढत जाईल तशा या अंध:श्रद्धा कमी होतील असे वाटले होते. पण उलट त्या वाढत आहेत. कारण या अंध:श्रद्धांना काही तरी वैज्ञानिक अर्थ आहे असे या सुशिक्षित लोकांना सांगितले जात आहे. अडाणी, खेडूत आणि अशिक्षित लोक तर अंध:श्रद्धांच्या आहारी गेलेले आहेतच पण सुशिक्षितही त्यापेक्षा काही वेगळे नाहीत. एकदा सुशिक्षितही अशा दुष्ट रूढींच्या आहारी जायला लागला की त्यांचे अनुकरण करीत अशिक्षित स’ाजही त्यांचे पालन करायला लागतो. कारण ज्या अर्थी एवढे शिकलेले लोक या रूढी पाळतात त्या अर्थी त्यात काही तरी अर्थ असणारच असे त्यांना वाटायला लागते.
काही मांडळीनी अंधश्रद्धेचे दुष्परिणाम न पाहता हे विधेयक धर्माच्या विरोधात असल्याची आवई उठविली आहे. विधेयक मजूर होऊन ते लागू झाल्यास कोणालाही सत्यनारायण पूजा घालता येणार नाही, आपल्या घरात आपल्या मर्जीने यज्ञ करणे हाही गुन्हा ठरेल, देवाचे नाव घेता येणार नाही, कीर्तन केले की अटक होईल अशी अतिशयोक्त विधाने करून हे लोक धार्मीक प्रवृत्तीच्या लोकांना या विधेयकाच्या विरोधात भडकावित आहेत. खरे पाहता कोणत्याही धर्मातील तत्त्वज्ञानाला आता महत्त्व उरलेले नाही. केवळ कर्मकांडांना महत्त्व आले आहे . ही कर्माकांडे अंध:श्रद्धांना जन्म देणारी आहेत. ती काळाच्या बदलानुसार बदलली जात नाहीत. अंधश्रध्देपोटी गेल्या दहा वर्षात राज्यात किमान तीन हजार जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे हे अंधश्रद्धा विरोधी विधयेक संमत करून तसा कायदा पारीत करून महाराष्ट्राने देशात नवा पायंडा घालून द्यायला हवा. हीच खर्‍या अर्थाने दाभोलकरांना आदरांजली ठरेल.

भगवान निळे

No comments:

Post a Comment