कधी वाटते आभाळाला उडी मारुनी स्पर्श करावा
गंध कस्तुरी या देहाचा, हक्काने तू पिऊन घ्यावा !!३!!
कधी वाटते इंद्रधनूमधी नवा देखणं रंग भरावा !!धृ !!
सांज ओली गहिवरलेली
आठवांना येते भरती
तुझा किनारा जगावेगळा
क्षितीजावरती गात्र उमलती
हाकारताना तुला अंतरी, वार्यावरती शब्द तरावा !!१!!
वेचुनी घेते स्वप्न बावळी
जागोजागी सांडलेली
उरते होऊनी तुझ्या भोवती
आरस सुखाची मांडलेली
क्षण हळवा तव मिलनाचा, जन्मोजन्मी असा उरावा !!२!!
निळ्या मनाच्या आभाळाला
पाऊले तुडवी काळोखाची
चिंब भिजता तुझ्या मिठीतून
ओळख पटते नव्या मुलुखाचीगंध कस्तुरी या देहाचा, हक्काने तू पिऊन घ्यावा !!३!!
No comments:
Post a Comment