पाहुनी वाट तिची रडलो मी जरासा
थांबू नकोस तुही पावसा पड जरासा
घामाचा गंध तिच्या पसरे रानोमाळी
पाहुनी कष्ट तिचे उडलो मी जरासा
हरवले हासणे अन विसरली लाजणे
झुंडीत लांडग्यांच्या नडलो मी जरासा
आरसा पुसला तरी भाग्य उजळेना
पाहताना स्वताला अडलो मी जरासा
हुलकावण्या देत मरणाला जगतो असा
उठलो, पडलो तरीही झडलो मी जरासा
करती बोभाटा ते माझ्या वागण्याचा
प्रेमात दुष्मनाच्या पडलो मी जरासा
सोसले तिने जितके सोसायचे होते
दुख्खाशी तिच्या जडलो मी जरासा
No comments:
Post a Comment