Wednesday, August 7, 2013

कळले तुला न तेंव्हा

कळले तुला न तेंव्हा, माझा आधार होता
हा जीव तुझ्यासाठी, माझा उधार होता

माझ्या मिठीत मी तुला, दिलेला आकार होता
दैवावर रुसण्याचा तुझा , रुसवा टुकार होता

शरीराच्या पलीकडल्या , प्रेमाचा सार होता
माझ्या अंतरीचा तो, छुपा होकार होता

छळणारा हुंदकाही, जीवाला घोर होता
अश्रूंनी काळजावर, कोरलेला प्रहार होता

आभाळ रंगविण्या , का तुझा खार होता ?
जगण्याच्या नियमांना, माझा नकार होता
फुलांसह फुलण्याचा, तेथे अभिभार होता
जो केला वार मी तो , वारही सुमार होता

जपलेल्या जखमांना , सुखाचा भार होता
नियतीशी झोंबताना, माझा डकार होता

No comments:

Post a Comment