Wednesday, August 7, 2013

विसरलोच आम्ही



कपडे कितीही घातले तरी, सावली नागडी असते
मायेची उब देणारी तेव्हा, आईची गोधडी असते

लाथाडले कितीही परंतु, दु:ख पायातच घुटमळते
जन्मोजन्मीचे मैत्र जसे, सोन्याची लगडी असते

मुंग्यांना साखर घालणारे, कोरडे अश्रू ढाळतात
काळीज तयांचे मात्र , नेहमीच दगडी असते

संकटाच्या समयी पहा, माणसेच धावून येती
मदतीला देव येतो, ही श्रद्धा बेगडी असते

धन्य जाहले जाती-जातीत रेषा ओढणारे
डोक्यावर मुकुट नव्हे, त्यांच्या पगडी असते

संसदेचा बाजार मानडणारे, खुलेआम भांडती जेव्हा
जनतेला लुटण्यासाठी, घातलेली फुगडी असते

देवाधर्माच्या लागुनी नादी, हाय! विसरलोच आम्ही
एकजूट भुकेकंगालांची, बंदुकीहून तगडी असते

No comments:

Post a Comment