Wednesday, August 7, 2013

बुद्धाच्या नावान



जयभीम म्हणण्या लाज वाटते काय करू मी राव ?
पण बुद्धाच्या नवान खंडोबा तू तरी पाव !!धृ !!

हुंडा घेवूनी लगीन केल
हळद, बाशिंग माथी बांधल
नवस केला नि मुलगा झाला
बाबांच्या नवान नारळ वाहिला
पोटासाठी शहरी आलो सोडूनी माग गाव !!१!!

राखीव जागा म्हणुनी तरलो
सचिवालया मधी चिकटलो
मोर्चामधली गर्दी वाढली
जयंतीची मग पावती फाडली
बदलूनी टाकीन म्हणतो आता माझ मी आडनाव !!२!!

चार भिंतीत कोंडूनी घेतो
अन्यायाच्या कथा वाचतो
विसरुनी सारी नातीगोती
स्वार्थासाठी खाल्ली माती
धेड हिंनाविता अजुनी बसतो जहरी माझ्या घाव !!३!!

No comments:

Post a Comment