उभ्या भरगच्च पिकात कसा येईना ढेकर?
घाम गाळून गाळून मला दिसेना भाकर !
नाही शिकले मी शाळा दुख्ख पाचवीला पूजले
ढकलत सार आयुष्य सुख गर्भात कुजले !
भूक चिकटली पोटाला नाही दानही चोखाया
आहे फाटक लुगड लाज नागडी राखाया !
देव देवळात बसे आहे का त्याला लाज ?
आम्हा नागड करून त्याला मढविती साज !
निळ्या वातीच्या उजेडात स्वप्न उद्याचे पाहते
आटलेल्या थानाला भूख लेकरू चोखते !
धन्यासंग रडताना रात सरता सरेना
त्याच्या उबदार मिठीत पाखरू धरता धरेना !
नाही लावली आम्ही दोन्ही हाताना ती धार
माझी लेकर करतील उद्या गरीबीवर वार !!
No comments:
Post a Comment