इंडियन मुजाहिदीनचा मास्टर माईंड आणि
संस्थापक यासीन भटकळला बेड्या ठोकण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले आहे.
देशभरात त्याच्यावर 50 पेक्षा जास्त बॉम्बस्फ्पटांचा कट रचल्याचा आरोप
असून तो 12 राज्यातील पोलिसांना हवा होता. राष्ट्रीय तपास संस्थेने
त्याच्यावर 35 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. यासीन भटकळला अटक होणे,
हे भारतीय सुरक्षायंत्रणाचे मोठे यश मानावे लागेल. गेल्या चार वर्षांपासून
राज्यातील आणि केंद्रातील तपास यंत्रणा यासिन भटकळच्या शोधात होत्या. देशात
वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये यासीन भटकळचाच हात होता, हे
तपासात स्पष्ट झाले होते. वेगवेगळ्या तरुणांच्या साह्याने भटकळ
पूर्वनियोजित कट आखून गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणत होता. त्यामुळे
पोलिस त्याचा शोध घेत होते. भटकळ मुळचा कर्नाटक राज्यातील भटकळ गावचा
रहिवासी आहे. त्याचे खरे नाव अहमद सिद्दीबाप्पा आहे. देशभरात इंडियन
मुजाहिदीनचे नेटवर्क तो आणि त्याचा भाऊ रियाझ याने उभारले. रियाझला
भेटण्यासाठी तो नेपाळला गेला होता. तिथेच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
महमुद असद नावाने त्याने पासपोर्ट बनविला होता. त्याचाच वापर करुन तो
नेपाळला जात होता. दिल्लीत त्याचे सासर असून अनेक वर्षे तो तिथे वास्तव्यास
होता.
काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याला अटक केल्यानंतर भटकळला जेरबंद करुन ‘एनआयए’ने मोठे यश संपादन केले आहे.
दिल्लीतील जामा मशिद बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, 2008 सालचा अहमदाबाद बॉम्बस्फोट, 2010 साली वाराणसी येथे झालेले बॉम्बस्फोट, 2013 चे हैदराबाद आणि बंगळुरु येथील बॉम्बस्फोटांचे कट भटकळने रचले होते. भटकळने पोलिसांना गुंगारा देऊन अनेकदा पळ काढला. परंतु, अखेर त्याला अटक करण्यात आली.
पुण्या-मुंबईसह ’हाराष्ट्रातील गणोशोत्सवाला टार्गेट करण्याचे आदेश यासीनला पाकिस्तानकडून ि’ळाले होते. यापूर्वी त्याने पुण्यातील दगडूशेठ गणपती मनदिराची रेकी केली होती, यासीनला भारत-नेपाळ सीमयेवर अटक करण्यात आली तेव्हा त्याने नेपाळमधील एका प्रकल्पावर काम करीत असल्याचे सांगितले. संगणक अभियंता म्हणून तेथे काम करतो, अशी माहिती तने दिली. परंतु, पोलिसांचे समाधान न झाल्याने मी युनानी डॉक्टर असल्याचे त्याने सांगितले. अखेर त्याला अटक करण्यात आली. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असादुल्लाह अख्तर यालाही यासीनसोबत अटक करण्यात आली.
दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर आणि हैदराबाद बॉम्बस्फोटकिंचे कट यासीनने रचले होते. 13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट मालिकेतील ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार येथील बॉम्ब यासीनने स्वतः ठेवले होते. यापूर्वी तो मुंबईत भाड्याने राहत होता. भायखळा येथील ‘एटीएस’च्या कार्यालयापासून अवघ्या 100 फुटांवर तो भाड्याने राहत होता. मी संगणक अभियंता आहे, असे सांगून त्याने घर घेतले होते. या बॉम्बस्फोट’ध्ये गुजराती लोकांसह व्यापारी लोकांना टार्गेट करण्यात आले होते.पुण्यातील दगडूशेठ हलवाई मनदिराची यासीननेच रेकी केली होती. ही माहिती उघडकीस आल्यावर या मनदिराची सुरक्षा वाढविण्यात आली होती. या मनदिराजवळ मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा यासीनचा प्रयास होता. पुण्यातील जर्मन बेकरीत यासीन भटकळनेच बॉम्ब ठेवला होता, असे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमीर्यात यासीन टोपी घालून दिसला होता. बॉम्बस्फोटच्या दिवशी त्याने दुकानाला भेट दिली होती. तेव्हापासून पुणे पोलिस त्याचा मागावर होते.
पुण्या-मुंबईतील बॉम्बस्फोटांसह दिल्ली, बंगळूर, हैदराबाद बॉम्बस्फोटआचे कट भटकळने रचले होते. इंडियन मुजाहिदीन या संघटनेत दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.
यासीन भटकळची माहिती देणार्याला 10 लाख रुपयांचे बक्षिस महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केले होते. महंमद अहमद, महंमद जलाल, इमरान आणि शाहरुख यांना त्याने नुकतेच रिक्रुट केले होते. त्यांची छायाचित्रे ’हाराष्ट्र ‘एटीएस’ने जाहीर केली होती.
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात दोन विदेशी पर्यटकांसह 17 जण ठार झाले होते. या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 56 नागरिक जखमी झाले होते. पुण्यातील जंगली महाराज रोडवर 1 ऑगस्ट 2012 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचा यासीन सूत्रधार होता. यात एक नागरिक जखमी झाला होता. बॉम्बची असेम्ब्ली योग्य प्रकारे न झाल्याने त्याची तीव्रता कमी झाली होती.
गेली दहा वर्षे तो भारतीय सुरक्षायंत्रणेला हुलकावण देत होता. त्याने पुणे शहराला दक्षिण भारतातील हालचालीचे एक महत्वाचे केंद्र बनविले होते. त्याला कर्नाटक पोलीस व केंद्र सरकारची नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी यानी नेपाळ सीमीवर अटक केल्याने गेली दहा वर्षे पुण्यात दहशतवादी कारवायांचे ठाणे उखडण्याची कोंडी फुटणार आहे.
सीबीआय आणि रॉ यांची मदत घेतल्यास मोठ्यात मोठ्या दहशतवाद्यालाही अटक करता येते, हे आता स्पष्ट झाले आहे. भटकळला अटक झाल्याने दहशतवादाच्या जाळ्यातले काही बरेच धागे आता हाती लागतील, अशी आशा वाटायला लागली आहे. तुंडा आणि भटकळ यांना अटक झाल्यामुळे दहशतवादी कारवायांच्या शेवटाची सुरूवात झाली आहे असे म्डटले तर अतिशोक्ती ठरू नये .
1979 सालपासून भारतविरोधी अतिरेकी शक्तींसाठी काम करणार तुंडाने दिलेल्या माहितीच्या आधारावर यासीन भटकळ याला अटक करता आली आहे. त्याच्या सोबत त्याचा दुसरा सहकारी असादुल्ला यालाही अटक झाली आहे. तुंडा बोलायला लागला म्हणून यासीन भटकळ सापडला. आता यासीन भटकळ बोलायला लागला की भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे हात अन्य दोन भटकळ बंधूंपर्यंत आणि पर्यायाने दाऊद इब्राहिमपर्यंत पोचण्याची आशा आहे.आजवरच्या दहशतवादी कारवायामध्ये सापडलेल्या संशयित गुन्हेगारांच्या जबाबामध्ये रियाज आणि इक्बाल भटकळ ही दोन नावेसुध्दा वारंवार आलेली आहेत. हे दोन बंधू पोलिसांना सापडणेसुध्दा फार महत्त्वाचे आहे. रियाज आणि इक्बाल भटकळ हे दोन सख्खे भाऊ आहेत. यासीन त्यांचा कोणी नाही. ते तिघेही कर्नाटकाच्या मनगळूर जिल्ह्यातील भटकळ गावचे राहणारे आहेत. खरे म्हणजे रियाझ आणि इक्बाल या दोन भावांचे आडनाव शहाबंद्री असे आहे आणि त्यांचे कुटुंब अजूनही भटकळमध्येच राहते.. 2005 साली इंजिनियर रियाज हा घरातून पळाला आणि त्याने दाऊद इब्राहिमशी संधान साधून दहशतवादी कारवाया मध्ये सहभागी होण्याचे ठरवले. त्याच्या पाठोपाठ 2010 साली त्याचा भाऊ डॉक्टर इक्बाल हाही पळाला. तो तर डॉक्टर होता. तर असे हे दोन बंधू आता पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमच्या आश्रयाने राहत आहेत.दाऊदला पकडायचे असेल तर यासीनला पकडणे महत्त्वाचे होते. आता या दोन बंधूंपर्यंत गेले तरच दाऊद सापडू शकेल.
देशात दहशतवादी हल्ले घडू नयेत म्हणून सध्या पावलोपावली सुरक्षा यंत्रणा दिसते. पुण्यात झालेल्या या स्फोटाबरोबरच देशात जेंव्हा जेंव्हा असे स्पष्ट झाले तेंव्हा तेंव्हा पुणे पोलिसांनी सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन,विमानतळ अशा रहदारीची ठिकाणे आणि मोठमोठ्या बाजारपेठा, हॉटेले, विद्यापीठे, महाविद्यालये, हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था आणि छोटे मोठे कारखाने यांना सुरक्षा वाढविण्यास सांगितले. पुणे शहर आणि पुणे - मुंबई मार्गावरील सर्व शहरे आणि नगरे येथील आस्थापनावरील सुरक्षा कर्मचारांची संख्या एक लाखावर आहे. अर्थात ही संख्या जशी मुंबईत आहे तशीच पुण्यात आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात व प्रत्येक शहरात आहे. पण अशा दहशतवाद्यांच्या हालचाली काय आहेत त्यांच्याकडे कोणती साधने आहेत आणि त्यांच्या तपासात या मोठ्या मनुष्य बळाचा काय उपयोग होऊ शकतो, याचा कसलाही विचार नसल्याने देशातील अशाच पद्धतीने उभे केलेले एक कोटीपेक्षाही अधिक सुरक्षा रक्षक ही बुजगावणी झाली आहेत.
ज्या खर्चावर जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च होतात तो खर्च जर अशापद्धतीने अनुत्पादक केला जात असेल तर रुपयाची अवस्था दयनीय होणार नाही तर काय होणार?
नेपाळच्या सीमीवर यासीनला अटक झाली ती पोलिसांच्याच कौशल्याने. पण एक कोटी सुरक्षा यंत्रणा हाताशी असल्यावर ही कामी ज्या गतीने व्हायला हवीत, तशी न झाल्याने जेहादी दहशतवाद्यांनी जाहीर केलेले युद्ध सुरुच राहणार आहे. पाकिस्तान आणि ‘अल् कायदा’शी संबंध असलेल्या भटकळचा मुक्काम पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका भंगार साठवण्याच्या गोडावूनमध्ये होता. एकदा अटक झाल्यावरही पोलीसांच्या तावडीतून सुटून तो येथे पळून आला होता व जर्मन बेकरीचा स्फो ट झाल्यावर पोलिसांना त्याचा सुगावा लागल्याने त्याने पुण्यातून मुक्काम हलविला. देशातील आठ राज्यात त्याने अशा स्फोट मालिकांचे यशस्वी व अयशस्वी प्रयत्न केले. त्याचा सर्वात अलिकडचा स्फोट म्हणजे बिहारमधील गया येथील बौद्ध विहारात घडविलेला स्फोट
दहशतवाद्यांचे हे हल्ले रोखणसाठी सुरक्षादलांमधये सुसूत्रता आणली पाहिजे. तरच ते हल्ले थांबणे शक्य आहे. नाही तर एखाद्या भटकळच्या अटकेवरच समाधान मानावे लागेल. अर्थात हे युद्ध फक्त भारतापुरते मर्यादित नाही. सार जगात त्याचा परिणाम जाणवत आहे. दहशतवादाविरूध्द सर्व जगानेच युध्द पुकारले पाहिजे. आणि त्यावर कायमचा तोडगाही शोधाला हवा.
- भगवान निळे