जिने अद्याप आपल्या चाकोरीबध्द नगरीची वेस
ओलांडली नाही ती तू
स्वप्नांच्या साम्राज्यात भटकणारी एक स्वप्नपरी
या कंगाल फकीराच वाडग्यात
काय डोकावून पाहतेस?
येथे जळून गेलेल्या ऋृतूंशिवाय
नि, करपलेल्या मोहराशिवाय
तुला काहीही दिसणार नाही यावर विश्वास ठेव !
ज्यांच्याजवळ पिढीजात वेदना. अन्
नशिबालाच दोष देण्याव्यतिरिक्त
स्वत:च्या मालकीचं असं काहीच नसतं
त्यांनी डोळयानची कवाडं बंद केली तरी
थांबत नाहीत त्यांच्या मेन्दुतील थैमान
अन्
ज्यांचे हात झिजता झिजता
मनगटंही ठिसूळ होत जातात कालांतरानं
त्यांच्याजवळ बोडकं आभाळ नि, उजाड माळरान
याखेरीज असा कोणता खजिना असणाराहे गुप्त गुहेत ?
असा कोणता द्रव पाझरत चालला
त्यांच्या शरीररातून की,
आकार घेन्याआधीच त्यांचा चेहरा ओरबडला जातो
या नगरीच्या गल्लीबोळातून चेहरा दडविताना
याचा शोध घेणाराहेस का तू?
अगं,
इथला हरेक माणूस
आपलं दारिद्रही झाकून ठेवतो इतरांच्या डोळंयापासून
सावधतेनं. हुशारीनं. नि,
आपल दु:खांनाच चक्क ‘हॅलो’ करून
हातमीळवणी करतो दु:खाशी.
जो चहा पील्यानंतर
पैसे देन्याचे मनात नसतानाही
उगीचच खिशात हात घालून
आपल्या दोस्तांपुढं सभ्पणाचं नाटक करतो
अन् जो,
आपला बाप अनवानी पायानं
या शहराच्या उकळत्या रस्तंयावरून फीरताना
आपल प्रतिष्ठित मीत्रांना कळू नये म्हणून
सोईस्करपणे आपल्या बापाचीच ओळख टाळतो
त्याच्या वेदनेचा देठ तू पकडला आहेस का?
हे स्वप्नपरे,
सकाळच्या भूपाळीनं
अथवा, गुलाम अलींच गझलांनी
झोपेतून उठणारी तू
टाईमपास म्हणून मोरांची पिसं रंगविताना
कधी पोट्रेट केलं आहेस का
कुंडीत अन्न शोधणार्या निरागस पोरांचं भवितव्या ?
ज्याचं दु:ख मोजता येणार नाही फुटपट्टीनं
त्या वेशीबाहेरील जगाचे रंगरूप
तू न्याहाळले आहेस का डोळे भरून ?
तू थोपवू शकतेस का
करूणेचे महासागर हृदयात
नि, त्यांच्या लढ्यात
तूही टाकू शकतेस का बरोबरीनं पाऊल
एक कॉम्रेड होऊन?
तप्पूर्वी,
हे स्वप्नगरीच्या स्वप्नपरे,
या फकीराच्या साम्राज्यात
बंदिस्त गुलाम नि, बेड्यांविरूध्दचा त्यांचा दिनरात संघर्ष
याखेरीज तुझ्या पदरात काहीही पडणार नाही
हे लक्षात असू दे!!
No comments:
Post a Comment