Friday, October 18, 2013

स्वप्ननगरीच्या स्वप्नपरीपुढे एका फकीराची कैफियत


जिने अद्याप आपल्या चाकोरीबध्द नगरीची वेस
ओलांडली नाही ती तू
स्वप्नांच्या साम्राज्यात भटकणारी एक स्वप्नपरी
या कंगाल फकीराच वाडग्यात
काय डोकावून पाहतेस?
येथे जळून गेलेल्या ऋृतूंशिवाय
नि, करपलेल्या मोहराशिवाय
तुला काहीही दिसणार नाही यावर विश्‍वास ठेव !
ज्यांच्याजवळ पिढीजात वेदना. अन्
नशिबालाच दोष देण्याव्यतिरिक्त
स्वत:च्या मालकीचं असं काहीच नसतं
त्यांनी डोळयानची कवाडं बंद केली तरी
थांबत नाहीत त्यांच्या मेन्दुतील थैमान
अन्
ज्यांचे हात झिजता झिजता
मनगटंही ठिसूळ होत जातात कालांतरानं
त्यांच्याजवळ बोडकं आभाळ नि, उजाड माळरान
याखेरीज असा कोणता खजिना असणाराहे गुप्त गुहेत ?
असा कोणता द्रव पाझरत चालला
त्यांच्या शरीररातून की,
आकार घेन्याआधीच त्यांचा चेहरा ओरबडला जातो
या नगरीच्या गल्लीबोळातून चेहरा दडविताना
याचा शोध घेणाराहेस का तू?

अगं,
इथला हरेक माणूस
आपलं दारिद्रही झाकून ठेवतो इतरांच्या डोळंयापासून
सावधतेनं. हुशारीनं. नि,
आपल दु:खांनाच चक्क ‘हॅलो’ करून
हातमीळवणी करतो दु:खाशी.
जो चहा पील्यानंतर
पैसे देन्याचे मनात नसतानाही
उगीचच खिशात हात घालून
आपल्या दोस्तांपुढं सभ्पणाचं नाटक करतो
अन् जो,
आपला बाप अनवानी पायानं
या शहराच्या उकळत्या रस्तंयावरून फीरताना
आपल प्रतिष्ठित मीत्रांना कळू नये म्हणून
सोईस्करपणे आपल्या बापाचीच ओळख टाळतो
त्याच्या वेदनेचा देठ तू पकडला आहेस का?

हे स्वप्नपरे,
सकाळच्या भूपाळीनं
अथवा, गुलाम अलींच गझलांनी
झोपेतून उठणारी तू
टाईमपास म्हणून मोरांची पिसं रंगविताना
कधी पोट्रेट केलं आहेस का
कुंडीत अन्न शोधणार्या निरागस पोरांचं भवितव्या ?
ज्याचं दु:ख मोजता येणार नाही फुटपट्टीनं
त्या वेशीबाहेरील जगाचे रंगरूप
तू न्याहाळले आहेस का डोळे भरून ?
तू थोपवू शकतेस का
करूणेचे महासागर हृदयात
नि, त्यांच्या लढ्यात
तूही टाकू शकतेस का बरोबरीनं पाऊल
एक कॉम्रेड होऊन?
तप्पूर्वी,
हे स्वप्नगरीच्या स्वप्नपरे,
या फकीराच्या साम्राज्यात
बंदिस्त गुलाम नि, बेड्यांविरूध्दचा त्यांचा दिनरात संघर्ष
याखेरीज तुझ्या पदरात काहीही पडणार नाही
हे लक्षात असू दे!!

आरशाच्या काही कविता



एकजात सर्वच माण्सं
आपापल्या परीनं खेाटं बोलत असतात.
आरसा बोलत नाही
असं असतानाही
पगाराच दिवशी माझा चेहरा
आरशात पडलेलाच दिसतो.



माण्सांचे चेहरे हरविलेले असतात
की,
माण्सं आपला चेहरा चार भिंतीत कोंडून
बिन चेहरनं वावरत असतात या गर्दीत ?
हा प्रश्न पडलवर मी
स्वत:चा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करतो
तर
आरशानेच आपला चेहरा गमावलेला असतो !



दु:खाशी हितगूज कराला
आरसा खूपच उपायोगी पडतो
आपण रडलो तर तोही रडतो
उदास झाल्यावर उदास होतो
पण गंध उडाल्यावर बिचारा आरसा
आपल्या दु:खाशी हितगूज कराला कुणाकडे जातो?



आरसा कधीच स्वतंत्र नसतो
त्याला जखडून ठेवणत येते
लाकडाच अथवा पत्रच चौकटीत
म्हणून तर तो ’ाझा चेहरा
बंदिस्त करून ठेवत नसेल ना?



उंबरठ्याबाहेर पडताना तू
सफाईदारपणे पदर सावरतेस
पुरूषांसारखी मांडी घालून तू
जेवायला कधी बसत नाहीस
भर माणसात हसायला आलवर
हसू दाबून दाताखाली पदर धरतेस
नवरने मारझोड केलवर
नशिबाला दोष देत त्याला शरीर देतेस
आरशासमोर मात्र तू खूपच बिनधास्त असतेस
हो ना?



प्रत्येकाच्याच खोबणीत
बुबुळाएैवजी बसविलेल्या असतात आरशांच्या काचा
घोषणा देणार मोर्चाकडं कानाडोळा करन्यासाठी.
असं मी म्हणताच
तिने चक्क डोळे मीटून घेतले.



आरशांच्या क्षेत्रफळानुसार
बदलत जातात माणसांचे आकार
लांबी/रुंदी/उंची/
आमच्या वस्तीत मात्र
कुणाजवळच मोठ्या आकाराचे आरसे नाहीत
नि, आरशात मावणारे चेहरेही.



उखळात डोके ठेवलवर
मुसळाची भीती बाळगाची नसते
हे मला आरशानेच शिकविले
जवेळी मी त्यात स्वत:ला पाहून घेतले.



स्वत:ला सावरता सावरता
आपण नकळत किती ढासळत जातो
या तटबंदी शहरात
आरसा मात्र भिंतीवर टिच्चून लटकलेला असतो.
- हे पाहून मी खळकन् फुटतो....



बिलोरी काचांच्या या दुनिेत
मी अजूनही
प्रत्येकासमोर आरसा धरतो.

तलवारीच्या पात्यावरील फुलपाखरू



माझ्या कवितेतील संदर्भ शोधताना
तिची दमछाक होते
नि, स्वत:ला सावरता सावरता
तिच्या कल्पनेच्या भिंती ढासळत जातात आपसूक.
कवितेमधील हरेक शब्दाच्या विळख्यातून
बाहेर पडन्याचा ती प्रयत्न करते
अन्,
त्यात स्वत:ला अधिकच गुरफटून घेते.
माझी कविता
कधीच हिरमुसून जात नाही
तिच्या जिवाच्या आट्यापिट्यानं
उलट
कवितेच्या ओळीओळीला
तलवारीच्या पात्याचं रूप येत जातं.
अशावेळी ती मला
तलवारीच्या पात्यावर
थरथरणार फुलपाखरासारखी दिसते.

माझ्या कवितेतून
मी मोजू शकतो
तिच्या तकलादू जगाच्या मर्यादित सीमारेषा
नि, समजू शकतो
तिच्या आदिम संकल्पना.
मी पाहतो
तिच्या मे न्दुची होत चाललेली वाताहत
नि, अनुभवू शकतो
चार भिंतींच्या आतील तिची घुसमट
ज्याविरूध्द
माझी कविता बोलते.
तिच्या ठसठसणार्या जखमेवर बोट ठेवते
तिला माणसांच्या चेहर्याची ओळख करून देते
तिला नव्या जगाचं
नवं तत्वज्ञान सांगते.

तलवारीच्या पात्याची
आता तिला सवय झाल्याचं एैकतोय!

शहराचे मालक आपणच असतो



प्रत्येक अनिकेत संध्याकाळी
चतकोर कागदावर सारं शहर रेखाटून
आपण चालू लागतो
शहर खिशात कोंबून
शहराच्या त्वचेवर पावलांचे ठसे कोरीत.
त्यावेळी या शहरातील
मृत्युच्या भयाण आवाजाचे प्रतिध्वनी
आपल्या काळजावर न उमटताच
विरघळून जातात आसमंतात .
मग आपण
या शहराचे भवितव्य आखीत
उभारत जातो इप्सित नवं कोरं शहर
आभाळभर.
शहराचे आराखडे पूर्ण करीत करीतच
आपण येतो फेसाळणार समुद्रापर्यंत नकळत
नि,
भिरकावून देतो शब्दांच्या पलिकडलं दु:ख
खिशात चुरगळलेल्या शहराच्या चेहज्यानिशी
आत्महत्या करणार्या तरूणीसारखं
खवळलेल लाटांमध्ये
अन्
छातीत समुद्र घेऊन परततो आपण
आपापल्या चार भिंतींच्या जगात.

प्रत्येक रात्री शहराचे मालक आपणच असतो....

Thursday, September 19, 2013

बायको पुन्हा मला...

बायको पुन्हा मला नवी वाटू लागली
माया आईची माझ्या मनी दाटू लागली

हात केसातून फिरता जखम वाहू लागली
गाय वेडी पाडसाला वनी चाटू लागली

बघता तिला सृष्टी सारी गोड भासू लागली
काळजाची जीवघेणी धून फाटू लागली

शांतता एकटेपणाची मला भेटू लागली
बायकोच्या भव्य कुशीत रात रेटू लागली

फडफडलो वादळातुनी आग पेटू लागली
झुळूक वेडी वार्याची अंग लपेटू लागली

पांगनार्या सावल्यांना वेळ काटू लागली
घेतानाच निरोप का दया आटू लागली ?

फेडली बाई रस्त्यात गर्दी पांगू लागली
वस्तीत झुंड हिजड्यांच्या टाळ्या पिटू लागली

बायको पुन्हा मला ....


बायको पुन्हा मला नवी वाटू लागली
माया आईची माझ्या मनी दाटू लागली

हात केसातून फिरता जखम वाहू लागली
गाय वेडी पाडसाला वनी चाटू लागली

बघता तिला सृष्टी सारी गोड भासू लागली
काळजाची जीवघेणी धून फाटू लागली

शांतता एकटेपणाची मला भेटू लागली
बायकोच्या भव्य कुशीत रात रेटू लागली

फडफडलो वादळातुनी आग पेटू लागली
झुळूक वेडी वार्याची अंग लपेटू लागली

पांगनार्या सावल्यांना वेळ काटू लागली
घेतानाच निरोप का दया आटू लागली ?

फेडली बाई रस्त्यात गर्दी पांगू लागली
वस्तीत झुंड हिजड्यांच्या टाळ्या पिटू लागली