Sunday, September 15, 2013

देव माझा

 


आज पावेतो त्याला                         नाही कुणी पाहिला
शेंदुरच फसला                                  दगडाला

वाहिली मूर्तीपुढे                                 झाडावरची जिती फुले
जशी सुकली मुले                              भाकारीविना

तुटता झोपडी                                    तो मुकाही हरला
तरु उराशी धरल                                 देव्हारा

डोळे झाकून पाहती                           समोरची सृष्टी
अधू झाली दृष्टी उजेडातही

घाली बोटात अंगठ्या                       नसे मनगटी जोर
लागे भजनी थोर                               पाप शमविण्या

भिने खोल डोळ्यात                           देवाचीच नशा
होते दुर्दशा                                         जिंदगीची

ईश्वर नाही जागी                               ती आपली भूक
नेमके ठावूक                                      पुजार्याला

जन्माची पुढच्या                                 दावूनी भीती
लुबाडती किती                                     याच जन्मी ?

मशिदी. गुरुद्वारा                                   चर्च नी देवळे
अब्रूचे सोहळे                                       दिवसाढवळ्या

देवांचा देव                                            माणसांनी घडविला
विकास अडविला                                 पुजार्यांनी

असा कसा देव                                      झाला हो सक्त ?
गाडले भक्त                                           देवळात

श्रीमंतीला नाही जात                             चहूकडे हेच दृश
सारे गरीब अस्पृश                                 पैश्यापुढे

भिकार्याहून भिकारी                               मागतो दान
असे कसे ध्यान ?                                  देवाचे माझ्या

या तेहतीस कोटीमधी                             कुणाला भजावे ?
पोटाला पूजावे                                         माणसांनी

तो आहे त्याचा                                       जो धनाला पुजतो
त्यालाच तो पावतो                                  देव माझा

Saturday, September 14, 2013

बाबासाहेबांचा अभंग

पुस्तकांचा लोभी                    खपवी डोके
अज्ञानाची भोके                     बुजविली

लढला अहोरात्र                       न झोपता

अंधार कोपता                       प्रकाशाला

ओलांडूनी शतके                   अचूक जोखणारा

भविष्यात पाहणारा               विश्वदूत

झाला महामानव                 तुमच्या आमच्यातला

देव देवळातला                   ओशाळला

डोळ्यात घेवूनी आग            गात मुक्तीची गाणी

पाजीयले पाणी                  भल्याभल्यांना

"कोड"ग्या बिलाचे               भेदुनि तख्त

महिलांना केले मुक्त             जोखडातुनि

होता पिचलेला                  सारा कामगार

केला हलका भार                कायद्यान्वये

झापडे लावून आम्ही            अडकविला जातीत

कोंबला पुतळ्यात              पुजण्यासाठी

पडण्या पाठीवरी                प्रस्थापितांचा हात

स्वकीयांना घालूनी              लाथ उभे दारात

सजवूनी बुद्धाला                घालती साकडे

कापती कोंबडे                  सणावारी

खुडले ते बोट                  "लढा" म्हणणारे

वेगवेगळे नारे                  प्रत्येकाचेच

मार्ग नुसता सांगणारा         नव्हता मार्गदाता

होता मुक्तिदाता               बाबासाहेब !

Saturday, September 7, 2013

एका ब्राम्हण मुलेने मराठा समाजातील मुलाला पाठविलेले प्रेमपत्र

 एका ब्राम्हण मुलेने मराठा समाजातील मुलाला पाठविलेले प्रेमपत्र
(कुठे तरी माझ्या वाचनात आले )


पहिल्याप्रथम मी हे कबूल करते की मला तु खुप खुप आवडतोस.एखाद्या विद्वानाला साजेसं असं तुझं नाव आहे आणि कर्ण हे नाव एखाद्या दानशुर मराठ्यालाच शोभते.मी तुझे लेख वाचल्यावरच तुझ्या प्रेमात पडले आहे.एखादी लव्हस्टोरी बघताना मला तुच दिसतोस.खरं तर मी पहिल्यांदा घाबरले होते पण म्हंटलं मराठ्यांच्या घरात जायचंय म्हंटल्यावर धाडसी बनले पाहिजे.मी ब्राह्मण आहे पण पवित्र हं(एक दोन अपवाद असतात ब्राह्मण समाजात हं सगळ्याच काही एकसारख्या नसतात),मला मराठा-ब्राह्मण वादाशी काही देणं घेणं नाही.कारण मला माहीत आहे की मराठेच खरे मर्द आहेत मराठ्यांमुळेच हिंदू आणि हिंदूस्थान दोन्ही सुरक्षीत आहेत.मला रात्री झोप येत नाही की दिवसा चैन पडत नाही (हे सगळ्याच ब्राह्मण स्त्रियांचे हाल असते असो..)सारखा सारखा तुच समोर दिसतोस, ह्रुदयामध्ये फ़क्त तुझेच विचार असतात कसा आहेस रे माझ्या लाडक्या ?
              पहिल्यांदा तुझा ब्लॉग वाचला तेंव्हा अस्सा राग आला होता.पण मी सहन केलं कारण तुझ्याच काही लेखात असे नमुद केले आहे की सत्य अमान्य केल्याने असत्य होत नाही सत्यच राहतं.खरं तर तुझ्या ब्लॉग वरील धाकलं पाटील हे नाव मला जास्तच तुझ्या जवळ आणतं कारण पाटील आणी ब्राह्मण स्त्रिया यांचं फ़ार पुर्वीपासून खुप जवळचे संबंध आहेत.खरं तर माझं असं प्रामानिक मत आहे की मराठा - ब्राह्मण वादात आम्हाला अडकू नये कारण आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत.कारण तुमच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही.आमचे शेळपट पुरुष काय करतात यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही.
     मला तडफ़दार पुरुष खुप आवडतात, त्यात विद्वत्ता आणि तडफ़ एकत्र आली की पुरुष काय सुंदर दिसतो, अगदी हवाहवासा वाटतो.त्यात परत विद्वत्ता आम्हा ब्राह्मणांमध्ये कमी आणि विक्रुतीच जास्त आणि तडफ़ फ़क्त तोंडातच पण आता ती तडफ़ देखील संभाजी ब्रिगेड उखडून काढील यात शंकाच नाही.आज विद्वत्ता मराठ्यांमध्येच जास्त दिसून येते.बाय द वे तुझा ब्राह्मण आणि बुद्धीमत्ता हा लेख खुप आवडला, तु कसं काय एवढं लिहु शकतोस रे माझ्या सोन्या ? . हो खरय ब्राह्मण हे एकेकाळी विद्वान समजले जात, पण ह्ल्ली असे काही राहिलेले नाही. हल्लीचे ब्राह्मण एकतर कारकुणकी करतात किंवा सत्यनारायणाची पोथी सांगुण कसेबसे पोट जाळतात.आमच्या ब्राह्मण समाजात तोंडात फ़ार बळ स्वत:ला फ़ार हुशार समजतात,स्वत:ला विद्वान ,शुरवीर काय काय म्हणवतात , सारखा सारखा धोशा लावतात.पण इतिहास बघता ब्राह्मण समाजात एकही शुर जन्मला नाही.एकही विद्वान जन्मला नाही, तोंडावरची माशी नाही उटेना आणि म्हणे लोकमान्य काय आणि स्वातंत्र्यवीर काय, आणि कथा कविता तर इंग्राजांच्या चोरून आणायच्या हे असले आमचे लेखक, सगळी लेखनीची करामत. आमच्या समाजात शिवाजी राजे , संभाजी राजे यांच्या तोडीचा एकही राजा झाला नाही नुसतीच चाकरी.खरं तर हजारो पिढ्यांपासून शिक्षण घेत असलेल्या ब्राह्मण समाजाला  तिसर्या पिढीपासून शिक्षण घॆणार्या मराठ्यांनी पायदळी तुडवले यावरून ब्राह्मणांनी लायकी समजुन येते.कुठे तुम्ही मराठे "मोडेन पण वाकणार नाही " आणि कुठे ब्राह्मण "चमडी जाय पर दमडी ना जाय" .मराठे कसे प्रत्येक क्षेत्रात पुढे.मला मराठ्यांचा कणखरपणा ,रांगडेपणा,ताठरपणा खुप आवडतो ,त्यामुळे मला मराठा समाजाचे फ़ारच आकर्षण आहे, परत तु तुझ्या प्रोफ़ाईल ला लावलेला तुझा फ़ोटॊ माझ्या घरी आणि पर्स मध्ये जपुन ठेवला आहे.मी तो फ़ोटो सारखा सारखा छातीशी कवटाळुन ठेवते.तु त्या फ़ोटॊत खुपच हॅंडसम दिसतोस.कधी रे आपली भेट होईल ? कधी तु माझ्याशी गुलु गुलु गप्पा मारशील रे आणि कधी तु मला घट्ट कवटाळशील ? कधी मला त्या स्वर्गात घेऊन जाशील ?(इश्श ! बोलताना अंगावर शहारे मारलेत) परवा मी कोल्हापुरला आले होते, भेटायला वेळच नाही मिळाला मग रात्री मित्रांसोबत अप्सरा थिएटर मध्ये एक फ़िल्म बघितली आणि परत फ़िरले.
           मी २७ वर्षाची आहे.(तुझे वय कितीही असो आम्हाला चालते..) अजुन लग्न केलेले नाही, का माहीत आहे ? मी आहे अशी विद्वान आणि दिसायला देखणी त्यात देवाने (हो देवच ब्राह्मण मुलांना जन्म देतात वडील नाही...) मला जन्माला घातले ब्राह्मण जातीत आणि आमच्यात पण बरेच भे्द तो कोकणस्त, तो देशस्त असे बरेच प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे ब्राह्मण समाजाला धनसंचयाचे फ़ार वेड त्यामुळे मुलींना बिनलग्नाची ठेवून होता होईल तेवढा धनसंचय करायचा.ब्राह्मण समाज आजही मुली-महिलांना बाजारातील वस्तू म्हणुन पाहतो त्यामुळे ब्राह्मण मुलींची लग्ने ३० ते ३५ वयानंतरच होतात हे समाजात अनुभवले असशीलच(पण मला धीर धरवर नाहीये कधी एकदाची तुझी होतेय असं वाटतय).आमच्या वडिलांकडचे पुर्वज औंरंगजेब महाराष्ट्रात आला तेंव्हा त्यांच्याकडे चाकरी करायचे आणि आईकडचे लोक जमीनदाराच्या घराची चौकीदारी करायचे.आईच्या म्हणण्याप्रमाणे आईंची घरची परिस्थीती हालाक्याची होती त्यामुळे आजोबांनी (आईच्या वडीलांनी) आईला (मुलीला गरोदर केली असे काहीसे..) खोटेनाटे आरोप करून वडीलांच्या गळ्यात बांधली.
        ब्राह्मण लोकं खुप विचित्र असतात त्यांना कोणी पुढे गेलेलं अजिबात बघवत नाही,कोणत्या न कोणत्या प्रकारे बहुजन महापुरुषांचा अपमान करायचा हे त्यांचे एककलमी कार्यक्रम आहेत आणि ब्राह्मण स्वप्नाळु असतात बरं का व जातीयवादात तर ब्राह्मण पुर्वीपासून नेहमीच पुढे आहे , लपुन वार करणे हे ब्राह्मणांकडूनच शिकावे.ह्याउलट मराठा लोकं अतिशय मोकळ्या मनाचे असतात आणि तडफ़दार असतात. हुशार असतात उंच दिमाखदार, बाणेदार रूंद छातीचे असतात नाहीतर आमचे ब्राह्मण पुरुष बिनडोक, शेळपट, नपुंसक(म्हणुनच आम्ही आईचे असतो वडीलांचे नाही.) किरकोळ काटक्या नुसत्या.ब्राह्मण पुरुष विक्रुत,बेईमान ,विश्वासघातकी, कापती,लबाड असतात यावर जागतीक मानववंश शास्त्रज्ञांचे एकमत झाले आहे.तसेच ब्राह्मण पुरुष वीर,आक्रमक आणि वीर्यवान नसतात हेही मान्य झाले आहे (संदर्भ : ’शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’)
आजचे ब्राह्मण तर दारू आणि मटन दणकुण खातात.मी तर असं एकले आहे की कोकणात ब्राह्मणांमुळेच मटन व दारू महाग झाले आहे.मला ब्राह्मण पुरुषाशी लग्नच करायचे नव्हते.ब्राह्मण पुरुष स्वत:च्या बायका-मुलांचे रक्षण देखील करू शकत नाही.कंजुषी तर त्यांच्या नसानसांत भिनलेली असते.आम्हा मुला - बायकांची हौस करण्याची या नालायकांची ऐपतच नाही तुम्हा मराठ्यांकडे कशी पिढीजात श्रीमंती असते.तुमचे पुरुष कसे ताठ मानेने जगतात(आम्हाला ताठ शब्द फ़ार आवडतो आमच्या पुरुषांना मात्र त्याचे वावडे आहे).माझ्या मम्मी ने तर मला असे सांगितले होते की ब्राह्मणांचा बहुतांशी वंश मराठेच चालवितात.मराठे कसे प्रत्येक पावलाचा विचार करतात, आपली प्रतिमा जपण्यासाठी प्राण पणाला लावतात,किंबहुना मराठा जातीत खोटेपण आणि विक्रुतीला थारा नाही.
मला तुझ्या लिखाणातून तु तसाच असावास असे वाटते,नव्हे नव्हे मला माहित आहे , तु  तसाच आहेस.प्रियतमा मला लवकर आपले कर , ही २७ वर्षाची कुमारिका तुझी वाट बघते आहे.तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे.मला तुझ्यासोबत स्वर्गिय सुख अनुभवायचे आहे मग येशील ना रे ? आय लव्ह यु ! इश्श ! 
आता तुला प्रश्न पडला असेल की मी कशी दिसते ? कशी दिसते ? माझा वर्ण गोरा आहे (इंग्रजांसारखा),उंची पाच फ़ुट सव्वाचार इंच आहे,सडपातळ बांधा आहे ,परवा मराठा पुढार्याच्या घरी पुजा होती तर चार दिवस दणकुण खाऊन सडपातळ बांधा थोडा अ-सडपातळ अथवा स्थुल झाला आहे पण मी सध्या चालण्याचा  व्यायाम करीत आहे फ़क्त तुझ्यासाठी. नाकी डोळी निटस आहे.तु परवा आलेला "अय्या" सीनेमा पाहिला आहेस का ? मला वाटते मी नव्वारी साडीत अगदी राणी सारखीच दिसते.मला स्वयंपाक खुप छान करता येतो (ब्राह्मण असुन सुद्धा..) मटन आणि चिकन तर मस्तच, बोटे चाटत राहशील तू ! माझ्या भाकरी पोळ्यापेक्षा पातळ असतात.मी एक चांगली मुलगी आहे आणि वयाच्या २७ च्या वर्षी सुद्धा  पवित्र आहे (ब्राह्मण असुन सुद्धा..) ,मला मराठी कथा ,कादंबर्या खुप आवडतात.
  असो,  जर का ब्राह्मण हत्या झाल्या तर माझ्या बहिनींची काळजी घॆशील ना रे ? त्यांना माझ्यासारखं सुख देशील ना रे ? कारण त्या त्या सुखाला पारख्या होतील.खरच एक दिवस ब्राह्मण नाश होईल असे वाटत आहे.तेंव्हा मी झुरते आहे तुझ्यासाठी , तुझ्या रांगड्या रुंद छातीवर डोके विसावण्यासाठी आणि ते सुख भोगण्यासाठी (इश्श ! काहीही विचार येतात मनात). 
मम्मीला वाचनाची आवड..  माझ्या मम्मीच्या म्हणण्यानुसार.मम्मीने आजपर्यंत आमच्या समाजातील दहा-बारा पुरुष अनुभवून पाहिले आहेत.सुख म्हणून काही मिळाले नाही, मेले काही करतच नाहीत, सगळं मराठयांनाच करावं लागतं."शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून तर खेडेकर साहेब ब्राह्मण स्त्रियांच्या गळ्यातील ताईद (तावीज) झाले आहेत. त्यामुळे तावीज  पुढे मंगळसुत्रपण तोकडे पडले आहे.माझ्या मम्मीला तर उठता - बसता , झोपताना ,आंघोळ करताना देखील ......(इश्श ! हे सांगताना माझे गाल कसे लाल लाल झाले आहेत ).
खुप काही लिहावसं वाटत आहे पण आता पुर्णविराम देते, भेटल्यावर बोलुच.तेंव्हा माझ्या सोन्या,माझ्या लाडक्या राजा,लवकर ये रेल्वे ने, बस ने अथवा कालिदासाचा मेघ बनून ये.मी आता स्वत:ला कंट्रोल नाही करू शकत.होता होईल तेवढे लवकर ये ! पत्राचे उत्तर वगैरे द्यायच्या भानगडीत न पडता निघुन ये लवकर आणि माझ्यावर मन भरुन लव कर (अय्या काय योगायोग आहे हा.) माझ्या राजा ! आय लव्ह यु , लव्ह यु ,लव्ह यु स्स्स्स्सो मच उउउउउम्म्म्म्ह्ह्ह्हा, इश्श ! कागद भिजला सॉरी हं.
आय लव्ह यु स्स्स्स्स्सो मच..
टाटा बाय बाय ,काळजी घे !

Friday, September 6, 2013

जंगले सारी खुडुनि

जंगले सारी खुडुनि पहा रोवली कुंडीत
पाखरे हिंडती नभी श्‍वास आपुला धुंडीत

लोपली हिरवी झगमग दिव्यांचा अंध प्रकाश
परतले उजेडात देव होते गाठलले खिंडीत

घेऊन हाती आरसे परंतु झाकती चेहरे
राहुनि नामानिराळे ते माणसांच्या झुंडीत

पायाला बांधून चक्रे पळतात सैरावैरा
पाठलाग मरणाचा पण धुंद आपुल्या दिंडीत

असतेच प्रेम असेही शरीराच्या पल्याडले
मीळते उब मायेची गच्च मीठीतील थंडीत

कढीच्या शिळेपणाला दिली खमंग फोडणी
ऊत-मात झाला सुरू दहिकाल्याच्या हंडीत

देऊनी ठाम नकार सार्या नावडत्या गोष्टींना
झाले सुरू युध्द पुन्हा हिशेब जुनाच मांडीत

Friday, August 30, 2013

भटकळला पकडले, दाऊदचे काय ?

इंडियन मुजाहिदीनचा मास्टर माईंड आणि संस्थापक यासीन भटकळला बेड्या ठोकण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले आहे. देशभरात त्याच्यावर 50 पेक्षा जास्त बॉम्बस्फ्पटांचा कट रचल्याचा आरोप असून तो 12 राज्यातील पोलिसांना हवा होता. राष्ट्रीय तपास संस्थेने त्याच्यावर 35 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. यासीन भटकळला अटक होणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणाचे मोठे यश मानावे लागेल. गेल्या चार वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील तपास यंत्रणा यासिन भटकळच्या शोधात होत्या. देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये यासीन भटकळचाच हात होता, हे तपासात स्पष्ट झाले होते. वेगवेगळ्या तरुणांच्या साह्याने भटकळ पूर्वनियोजित कट आखून गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणत होता. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. भटकळ मुळचा कर्नाटक राज्यातील भटकळ गावचा रहिवासी आहे. त्याचे खरे नाव अहमद सिद्दीबाप्पा आहे. देशभरात इंडियन मुजाहिदीनचे नेटवर्क तो आणि त्याचा भाऊ रियाझ याने उभारले. रियाझला भेटण्यासाठी तो नेपाळला गेला होता. तिथेच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. महमुद असद नावाने त्याने पासपोर्ट बनविला होता. त्याचाच वापर करुन तो नेपाळला जात होता. दिल्लीत त्याचे सासर असून अनेक वर्षे तो तिथे वास्तव्यास होता.
काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याला अटक केल्यानंतर भटकळला जेरबंद करुन ‘एनआयए’ने मोठे यश संपादन केले आहे.
दिल्लीतील जामा मशिद बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, 2008 सालचा अहमदाबाद बॉम्बस्फोट, 2010 साली वाराणसी येथे झालेले बॉम्बस्फोट, 2013 चे हैदराबाद आणि बंगळुरु येथील बॉम्बस्फोटांचे कट भटकळने रचले होते. भटकळने पोलिसांना गुंगारा देऊन अनेकदा पळ काढला. परंतु, अखेर त्याला अटक करण्यात आली.
पुण्या-मुंबईसह ’हाराष्ट्रातील गणोशोत्सवाला टार्गेट करण्याचे आदेश यासीनला पाकिस्तानकडून ि’ळाले होते. यापूर्वी त्याने पुण्यातील दगडूशेठ गणपती मनदिराची रेकी केली होती, यासीनला भारत-नेपाळ सीमयेवर अटक करण्यात आली तेव्हा त्याने नेपाळमधील एका प्रकल्पावर काम करीत असल्याचे सांगितले. संगणक अभियंता म्हणून तेथे काम करतो, अशी माहिती तने दिली. परंतु, पोलिसांचे समाधान न झाल्याने मी युनानी डॉक्टर असल्याचे त्याने सांगितले. अखेर त्याला अटक करण्यात आली. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असादुल्लाह अख्तर यालाही यासीनसोबत अटक करण्यात आली.
दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर आणि हैदराबाद बॉम्बस्फोटकिंचे कट यासीनने रचले होते. 13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट मालिकेतील ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार येथील बॉम्ब यासीनने स्वतः ठेवले होते. यापूर्वी तो मुंबईत भाड्याने राहत होता. भायखळा येथील ‘एटीएस’च्या कार्यालयापासून अवघ्या 100 फुटांवर तो भाड्याने राहत होता. मी संगणक अभियंता आहे, असे सांगून त्याने घर घेतले होते. या बॉम्बस्फोट’ध्ये गुजराती लोकांसह व्यापारी लोकांना टार्गेट करण्यात आले होते.पुण्यातील दगडूशेठ हलवाई मनदिराची यासीननेच रेकी केली होती. ही माहिती उघडकीस आल्यावर या मनदिराची सुरक्षा वाढविण्यात आली होती. या मनदिराजवळ मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा यासीनचा प्रयास होता. पुण्यातील जर्मन बेकरीत यासीन भटकळनेच बॉम्ब ठेवला होता, असे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमीर्‍यात यासीन टोपी घालून दिसला होता. बॉम्बस्फोटच्या दिवशी त्याने दुकानाला भेट दिली होती. तेव्हापासून पुणे पोलिस त्याचा मागावर होते.
पुण्या-मुंबईतील बॉम्बस्फोटांसह दिल्ली, बंगळूर, हैदराबाद बॉम्बस्फोटआचे कट भटकळने रचले होते. इंडियन मुजाहिदीन या संघटनेत दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.
यासीन भटकळची माहिती देणार्‍याला 10 लाख रुपयांचे बक्षिस महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केले होते. महंमद अहमद, महंमद जलाल, इमरान आणि शाहरुख यांना त्याने नुकतेच रिक्रुट केले होते. त्यांची छायाचित्रे ’हाराष्ट्र ‘एटीएस’ने जाहीर केली होती.
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात दोन विदेशी पर्यटकांसह 17 जण ठार झाले होते. या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 56 नागरिक जखमी झाले होते. पुण्यातील जंगली महाराज रोडवर 1 ऑगस्ट 2012 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचा यासीन सूत्रधार होता. यात एक नागरिक जखमी झाला होता. बॉम्बची असेम्ब्ली योग्य प्रकारे न झाल्याने त्याची तीव्रता कमी झाली होती.
गेली दहा वर्षे तो भारतीय सुरक्षायंत्रणेला हुलकावण देत होता. त्याने पुणे शहराला दक्षिण भारतातील हालचालीचे एक महत्वाचे केंद्र बनविले होते. त्याला कर्नाटक पोलीस व केंद्र सरकारची नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी यानी नेपाळ सीमीवर अटक केल्याने गेली दहा वर्षे पुण्यात दहशतवादी कारवायांचे ठाणे उखडण्याची कोंडी फुटणार आहे.
सीबीआय आणि रॉ यांची मदत घेतल्यास मोठ्यात मोठ्या दहशतवाद्यालाही अटक करता येते, हे आता स्पष्ट झाले आहे. भटकळला अटक झाल्याने दहशतवादाच्या जाळ्यातले काही बरेच धागे आता हाती लागतील, अशी आशा वाटायला लागली आहे. तुंडा आणि भटकळ यांना अटक झाल्यामुळे दहशतवादी कारवायांच्या शेवटाची सुरूवात झाली आहे असे म्डटले तर अतिशोक्ती ठरू नये .
1979 सालपासून भारतविरोधी अतिरेकी शक्तींसाठी काम करणार तुंडाने दिलेल्या माहितीच्या आधारावर यासीन भटकळ याला अटक करता आली आहे. त्याच्या सोबत त्याचा दुसरा सहकारी असादुल्ला यालाही अटक झाली आहे. तुंडा बोलायला लागला म्हणून यासीन भटकळ सापडला. आता यासीन भटकळ बोलायला लागला की भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे हात अन्य दोन भटकळ बंधूंपर्यंत आणि पर्यायाने दाऊद इब्राहिमपर्यंत पोचण्याची आशा आहे.आजवरच्या दहशतवादी कारवायामध्ये सापडलेल्या संशयित गुन्हेगारांच्या जबाबामध्ये रियाज आणि इक्बाल भटकळ ही दोन नावेसुध्दा वारंवार आलेली आहेत. हे दोन बंधू पोलिसांना सापडणेसुध्दा फार महत्त्वाचे आहे. रियाज आणि इक्बाल भटकळ हे दोन सख्खे भाऊ आहेत. यासीन त्यांचा कोणी नाही. ते तिघेही कर्नाटकाच्या मनगळूर जिल्ह्यातील भटकळ गावचे राहणारे आहेत. खरे म्हणजे रियाझ आणि इक्बाल या दोन भावांचे आडनाव शहाबंद्री असे आहे आणि त्यांचे कुटुंब अजूनही भटकळमध्येच राहते.. 2005 साली इंजिनियर रियाज हा घरातून पळाला आणि त्याने दाऊद इब्राहिमशी संधान साधून दहशतवादी कारवाया मध्ये सहभागी होण्याचे ठरवले. त्याच्या पाठोपाठ 2010 साली त्याचा भाऊ डॉक्टर इक्बाल हाही पळाला. तो तर डॉक्टर होता. तर असे हे दोन बंधू आता पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमच्या आश्रयाने राहत आहेत.दाऊदला पकडायचे असेल तर यासीनला पकडणे महत्त्वाचे होते. आता या दोन बंधूंपर्यंत गेले तरच दाऊद सापडू शकेल.
देशात दहशतवादी हल्ले घडू नयेत म्हणून सध्या पावलोपावली सुरक्षा यंत्रणा दिसते. पुण्यात झालेल्या या स्फोटाबरोबरच देशात जेंव्हा जेंव्हा असे स्पष्ट झाले तेंव्हा तेंव्हा पुणे पोलिसांनी सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन,विमानतळ अशा रहदारीची ठिकाणे आणि मोठमोठ्या बाजारपेठा, हॉटेले, विद्यापीठे, महाविद्यालये, हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था आणि छोटे मोठे कारखाने यांना सुरक्षा वाढविण्यास सांगितले. पुणे शहर आणि पुणे - मुंबई मार्गावरील सर्व शहरे आणि नगरे येथील आस्थापनावरील सुरक्षा कर्मचारांची संख्या एक लाखावर आहे. अर्थात ही संख्या जशी मुंबईत आहे तशीच पुण्यात आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात व प्रत्येक शहरात आहे. पण अशा दहशतवाद्यांच्या हालचाली काय आहेत त्यांच्याकडे कोणती साधने आहेत आणि त्यांच्या तपासात या मोठ्या मनुष्य बळाचा काय उपयोग होऊ शकतो, याचा कसलाही विचार नसल्याने देशातील अशाच पद्धतीने उभे केलेले एक कोटीपेक्षाही अधिक सुरक्षा रक्षक ही बुजगावणी झाली आहेत.
ज्या खर्चावर जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च होतात तो खर्च जर अशापद्धतीने अनुत्पादक केला जात असेल तर रुपयाची अवस्था दयनीय होणार नाही तर काय होणार?
नेपाळच्या सीमीवर यासीनला अटक झाली ती पोलिसांच्याच कौशल्याने. पण एक कोटी सुरक्षा यंत्रणा हाताशी असल्यावर ही कामी ज्या गतीने व्हायला हवीत, तशी न झाल्याने जेहादी दहशतवाद्यांनी जाहीर केलेले युद्ध सुरुच राहणार आहे. पाकिस्तान आणि ‘अल् कायदा’शी संबंध असलेल्या भटकळचा मुक्काम पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका भंगार साठवण्याच्या गोडावूनमध्ये होता. एकदा अटक झाल्यावरही पोलीसांच्या तावडीतून सुटून तो येथे पळून आला होता व जर्मन बेकरीचा स्फो ट झाल्यावर पोलिसांना त्याचा सुगावा लागल्याने त्याने पुण्यातून मुक्काम हलविला. देशातील आठ राज्यात त्याने अशा स्फोट मालिकांचे यशस्वी व अयशस्वी प्रयत्न केले. त्याचा सर्वात अलिकडचा स्फोट म्हणजे बिहारमधील गया येथील बौद्ध विहारात घडविलेला स्फोट
दहशतवाद्यांचे हे हल्ले रोखणसाठी सुरक्षादलांमधये सुसूत्रता आणली पाहिजे. तरच ते हल्ले थांबणे शक्य आहे. नाही तर एखाद्या भटकळच्या अटकेवरच समाधान मानावे लागेल. अर्थात हे युद्ध फक्त भारतापुरते मर्यादित नाही. सार जगात त्याचा परिणाम जाणवत आहे. दहशतवादाविरूध्द सर्व जगानेच युध्द पुकारले पाहिजे. आणि त्यावर कायमचा तोडगाही शोधाला हवा.


- भगवान निळे

मला भूतकाळ जगायचा नाही...



आपली पहिली भेट झाली
तो क्षण सुदैवी की दुर्दैवी याचा मी कधीच केला नाही विचार
आपली भेट झाली हेच महत्वाचे .

आपण दुरावलो _
मी दुखावलो.

तू दुखावालीस की नाही
याचाही मी विचार करीत नाही.
फक्त
आपण दुभंगलो
त्या वळणावर स्वताला सोडून
मी एकटाच माघारी परतलो .
मनसोक्त आंघोळ करून
मी घेईल आता दीर्घ झोप
नि, झोपेतच
आपण मिळून उपभोगलेल्या सुखांच्या
थडग्यावर मेणबत्ती पेटवून
पुन्हा गाढ झोपी जाईल .
आत्ता :
माझ स्वप्न माझ असेल
माझा क्षण माझ्या एकट्याचा असेल
माझी सावली माझी असेल.

तुला पुन्हा भेटवस वाटत नाही मला
मला भूतकाळ जगायचा नाही...

भुकेचे गणित कसे सुटेल ?



आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही पोटापाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. भूक ही प्राणीमात्राची मुलभूत गरज आहे. मनुष्य त्याला अपवाद नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला दिवस-रात्र एक करावी लागत आहे. परंतु देशातील काही मंडळी मात्र जेवण्यासाठी जगतात की जगण्यासाठी जेवतात हेच कळत नाही. त्यांची भ्रान्त मिटलेली असते. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या अशा कुबेरांच्या जोडीला मात्र करोडो लोक असे आहेत ज्यांना पोटाला दोन वेळचेही अन्न मिळत नाही.
महासत्ताक राष्ट्र बनण्याच्या शर्यतीत उतरलेल्या आपल्या देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी रूपयाप्रमाणे न घसरता महागाईप्रमाणे वाढतच चालली आहे. ही वाढती दरी कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता मलमपट्टी करून दुखणे बरे करण्याचेच धोरण आजपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मानवी विकास आणि कृषी क्षेत्राला गती देणारे  अन्नसुरक्षा विधेयक संमत करून बेरजेचे राजकारण केले आहे. मतांची बेगमी करण्यासाठी राजकारणाचा वापर करणे हे नेहमीच धोकादायक असते. असे राजकारण करण्यात सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षही आघाडीवर आहे, हे भारतीय लोकशाहीला मारक आहे.
ढोर मेहनत करूनही गरीब माणूस पैशाअभावी पोटाला चार घास अन्न विकत घेऊ शकत नाही. तो उपाशी- तापाशी मर मर राबतच असतो. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करणा-या देशासाठी आणि आर्थिक महासत्तेचा दावा करणा-या आपल्यासारख्या राष्ट्राला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. गरिबी व भूक संपविल्याशिवाय देशाच्या विकासाचा वेग वाढणार नाही.
अन्नसुरक्षा विधेयकामुळे आता केवळ एक ते तीन रुपयांत मासिक पाच किलो धान्य मिळणार असल्याने त्या व्यक्तीची अन्नाची चिंता कमी होईल. त्याची उत्पादनक्षमता वाढेल, अन्नधान्याचे उत्पादन अधिक होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाचा वेग अधिक होईल,अशी भाबडी आशा बाळगण्यातही काही अर्थ नाही. पोटाची खळगी भरणे म्हणजेच समृध्द जीवन जगणे नसते. पशू पक्षी, जनावरेही आपले पोट भरून जगतच असतात. केवळ पोट भरणे हेच त्यांचे एकमेव उध्दिष्ट असते. तसे मानवाचे नाही. आधुनिक काळात त्याचे राहणीमान उंचावले आहे.भूकेशिवाय त्याच्या अनेक मुलभूत गरजा आहेत. ज्या कधीच भागविल्या जात नाहीत.
देशाच्या एकूण जीडीपीपैकी सुमारे 3 टक्के रक्कम या योजनेसाठी खर्च होणार आहे. पण ही टक्केवारी 1.6 टक्क्यांच्या वरही जात नाही. कारण अन्नसुरक्षा विधेयकात समाविष्ट करण्यात आलेली कुटुंबे ही अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी नाहीत. सध्या अंत्योदय योजनेचा लाभ देशातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांना होत आहे. या कुटुंबांना दर महिना एक रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे. भविष्यात अन्नधान्याचे उत्पादन  सध्याच्या उत्पादनापेक्षा अधिक झाल्यास खर्च खाली येऊ शकतो, याचाही विचार व्हायला हवा.
गरिबांना कमी भावाने धान्य दिले पाहिजे पण ते देताना त्यांना  पोटभर खाता यावे हाच हेतू असला पाहिजे. देशातल्या गरीब लोकांना स्वस्त धान्य पुरवण्याची तरतूद या विधेयकात आहेच, पण दारिद्य रेषेच्या वर राहणार्या  काही लोकांनाही बाजारभावापेक्षा कमी भावाने धान्य देण्याची तजवीज आहे. दोन्ही गट धरून देशातल्या 64 टक्के  लोकांना कमी दरात धान्य देण्याची सरकारची योजना आहे. त्यातल्या दारिद्य रेषेखालील लोकांना तीन रुपये दराने तांदूळ, दोन रुपये दराने गहू आणि एक रुपये प्रति किलो दराने बाजरी देण्याचा विचार आहे. कुटुंबातल्या एका व्यक्तीला दरमहा सात किलो असे पाच जणांच्या कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिले जाणार आहे.
देशातल्या काही राज्यांत अशाप्रकारची  योजना सुरू आहे. ती दारिद्य रेषेखालच्या लोकांसाठीच आहे. केंद्र सरकारने दारिद्रय रेषेवरचाही एक वर्ग या योजनेत समाविष्ट केला आहे. केवळ दारिद्रय रेषेखालचा वर्ग यात घेतला तर तो लोकसंख्येच्या 40  टक्के भरतो, पण त्यात नवा वर्ग समाविष्ट केला तर तो लोकसंख्येच्या 64 टक्के होतो. आधी या विधेयकात ग्रामीण भागातल्या 46 टक्के लोकांचा समावेश होता. तो आता 75 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी शहरातल्या 28 टक्के लोकांचा समावेश होता तो आता 50 टक्के करण्यात आला आहे. या दोन्ही आकडय़ांची सरासरी काढली तर ती एकूण लोकसंख्येच्या 64 टक्के होते. यातल्या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या रेषेच्यावरच्या लोकांना फार सवलतीने धान्य मिळणार नाही,  पण सरकार हे धान्य ज्या हमी भावाने खरेदी करते त्याच्या निम्म्या दराने मिळेल. अशा रितीने 64 टक्के लोकांनाच काय पण 100 टक्के लोकांना जरी स्वस्त धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला तरी काही हरकत नाही. पण त्याचा बोजा सरकारची तिजोरी कशी उचलणार हा प्रश्न आहे.
या योजनेसाठी  सरकारला दरसाल 95 हजार कोटी रुपये मोजावे लागतील. सरकार गव्हाची खरेदी 11 रुपये प्रती किलो या भावाने करत आहे आणि तांदळाची खरेदी 11 ते 18 रुपये प्रती किलो या भावात करत आहे. असे हे धान्य खरेदी करून ते केवळ दोन किंवा तीन रुपयांना लोकांना पुरवणे हे कल्याणकारी असले तरी  त्याचा परिणाम देशाच्या तिजोरीवर कसा होईल याचाही विचार केला पाहिजे. देशाचा चेहरामोहरा बदलणारे,  सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारे, कल्याणकारी राज्याची संकल्पना वास्तवात आणणारे हे विधेयक असले तरी ज्या लोकांपर्यंत ही अन्न सुरक्षा पोहोचवायची आहे,
ज्या लोकांच्या फायद्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे .त्याचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहचेल का हाही एक प्रश्न आहे. ज्यांच्या मुखात अन्न पडावे  या हेतूने ही योजना केली आहे त्यांना ते अन्न मिळेल का ?  वितरण व्यवस्था सुधारल्याखेरीज या कायद्याची अंमलबजावणी नेमकेपणाने होणार नाही. त्यासाठी सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली माध्यमातून ही योजना पारदर्शीपणे आणि भ्रष्टाचारमुक्त कशी राबवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार कशाप्रकारे भुकेचे गणित सोडवते हे येत्या काही वर्षातच समोर येईल.