Friday, September 6, 2013

जंगले सारी खुडुनि

जंगले सारी खुडुनि पहा रोवली कुंडीत
पाखरे हिंडती नभी श्‍वास आपुला धुंडीत

लोपली हिरवी झगमग दिव्यांचा अंध प्रकाश
परतले उजेडात देव होते गाठलले खिंडीत

घेऊन हाती आरसे परंतु झाकती चेहरे
राहुनि नामानिराळे ते माणसांच्या झुंडीत

पायाला बांधून चक्रे पळतात सैरावैरा
पाठलाग मरणाचा पण धुंद आपुल्या दिंडीत

असतेच प्रेम असेही शरीराच्या पल्याडले
मीळते उब मायेची गच्च मीठीतील थंडीत

कढीच्या शिळेपणाला दिली खमंग फोडणी
ऊत-मात झाला सुरू दहिकाल्याच्या हंडीत

देऊनी ठाम नकार सार्या नावडत्या गोष्टींना
झाले सुरू युध्द पुन्हा हिशेब जुनाच मांडीत

No comments:

Post a Comment