आज पावेतो त्याला नाही कुणी पाहिला
शेंदुरच फसला दगडाला
वाहिली मूर्तीपुढे झाडावरची जिती फुले
जशी सुकली मुले भाकारीविना
तुटता झोपडी तो मुकाही हरला
तरु उराशी धरल देव्हारा
डोळे झाकून पाहती समोरची सृष्टी
अधू झाली दृष्टी उजेडातही
घाली बोटात अंगठ्या नसे मनगटी जोर
लागे भजनी थोर पाप शमविण्या
भिने खोल डोळ्यात देवाचीच नशा
होते दुर्दशा जिंदगीची
ईश्वर नाही जागी ती आपली भूक
नेमके ठावूक पुजार्याला
जन्माची पुढच्या दावूनी भीती
लुबाडती किती याच जन्मी ?
मशिदी. गुरुद्वारा चर्च नी देवळे
अब्रूचे सोहळे दिवसाढवळ्या
देवांचा देव माणसांनी घडविला
विकास अडविला पुजार्यांनी
असा कसा देव झाला हो सक्त ?
गाडले भक्त देवळात
श्रीमंतीला नाही जात चहूकडे हेच दृश
सारे गरीब अस्पृश पैश्यापुढे
भिकार्याहून भिकारी मागतो दान
असे कसे ध्यान ? देवाचे माझ्या
या तेहतीस कोटीमधी कुणाला भजावे ?
पोटाला पूजावे माणसांनी
तो आहे त्याचा जो धनाला पुजतो
त्यालाच तो पावतो देव माझा
No comments:
Post a Comment